Friday, July 09, 2010

Ek Chhan political Kavita

___________________

ना ‘शरदा’चे चांदणे
ना ‘सोनिया’चे दिस
‘घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला
म्हणून ‘आय’ कासावीस

‘कमळा’च्या पाकळ्यांची
यादवी छळते मनाला
‘धनुष्य’ आलंय मोडकळीस
पण जाणीव नाही ‘बाणा’ला

विळा, हातोडा अन् कंदिलाला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढू शकेल एवढी
‘रेल्वे इंजिना’त जान नाही

मन आहे ‘मुलायम’
पण ‘माया’ कुठं दिसत नाही
‘हत्ती’वरून फिरणारा
‘सायकल’वर बसत नाही

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’
पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही
विसरलेले ‘आठवले’ तरीही
‘गवई’ गीत ‘गाणार’ नाही

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा
‘पार्टी’साठी आतूर
कुंपणच खातंय शेताला
अन् बुजगावणही फितूर
________________

By Suhas Patil (surapasa@hotmail.com)
Fwd
By Vilas Bhonde (vbhonde6@gmail.com)

________________

1 comment:

  1. ‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा
    ‘पार्टी’साठी आतूर
    कुंपणच खातंय शेताला
    अन् बुजगावणही फितूर - its right...

    ReplyDelete